PHOTO GALLERY : राज्यपाल, मद्यराष्ट्र ते दाऊदबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री? भाषणातील महत्वाचे मुद्दे
राज्याला मद्यराष्ट्र म्हणून बदनाम करू नका - राज्याला मद्यराष्ट्र म्हणून बदनाम करू नका, सर्वातच कमी मद्याची दुकाने महाराष्ट्रात आहेत. उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेशात महाराष्ट्रापेक्षा जास्त मद्याची दुकानं आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यपाल हे संवैधानिक पद, त्यांच महत्व विरोधकांना जास्त माहिती , राज्यपाल हे संवैधानिक पद, त्यांच महत्व विरोधकांना जास्त माहिती आहे, विरोधक केवळ तक्रारी करण्यासाठी हक्काने राज्यपालाकडे जातात असं मुख्यमंत्री म्हणाले. एखादी तक्रार राज्यपालांकडे नोंदवतो विरोध तुम्ही करु शकता मात्र त्याला काही सीमा असतात. राज्याच्या संस्कृतीला शोभणारा नव्हता.
देवेंद्रजी तुम्ही 'रॉ'मध्ये हवं होतं देवेंद्रजी तुम्ही रॉ, सीबीआयमध्ये जायला हवंत, तुम्ही ती माहिती त्यांना दिली. त्यांचं काम वेगाने होईल. ईडी आहे की घरगडी आहे तेच समजत नाही
आता दाऊदच्या नावाने मतं मागणार का? दाऊद आहे कुठे?आधी रामाच्या नावाने मतं मागितली आता दाऊदच्या नावाने मतं मागणार का? मग तो दाऊद आहे कुठं हे कुणालाच माहिती नाही. दाऊदला आम्ही फरफडत आणू असं म्हटलं होतं, ओसामाला मारलं तसं दाऊदच्या घरात घुसून त्याला मारा, देशद्रोहाच्या विरोधात आम्ही आहोतच, त्यात दुमत नाही.
पहाटेचा प्रयोग यशस्वी झाला असता तर... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही सगळे भ्रष्टाचारी आणि दाऊदची माणसं आहोत असं विरोधक म्हणतायंत. पण पहाटेचा प्रयोग यशस्वी झाला असता तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुमच्या मांडीला मांडी लावून बसले असते.
आज अघोषित आणीबाणी सुरू नितीन गडकरी म्हणाले वाल्याचा वाल्मिकी होतो. आता भाजपने ह्युमन लॉंड्रिग सुरु केलं आहे. पण हे सगळं कुणाला माहिती नाही असं काही समजू नका. हा महाराष्ट्र आहे. इंदिरा गांधींनी आणीबाणीची घोषणा केली होती, आज अघोषित आणीबाणी सुरू आहे.
नवाब मलिाकांचा राजीनामा मागतायत, पण... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, नवाब मलिक हा दाऊदचा माणूस आहे असा त्यांच्यावर आरोप केला जातोय. मग तो पाच वेळी निवडूण येतोय, मंत्री होतोय तरीही केंद्राच्या यंत्रणांना समजलं नाही. त्यांना आता समजतंय की तो दाऊदचा माणूस आहे. केंद्राच्या यंत्रणा मग करतायंत काय? नुसता थाळ्या वाजवायचं, दिवे पेटवायचं काम करतायत का?