Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कश्मीर फाईल्स पाहिल्यानंतर अंदमानातील चित्रपटगृहात पहिल्यांदाच घुमले राष्ट्रगीताचे स्वर
शब्दामृत प्रकाशनाने अंदमानात कश्मीर फाईल्सच्या विशेष शोचं आयोजन केले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी अभिनेते शरद पोंक्षे आणि लेखक अभ्यासक पार्थ बावस्कर यांच्यासह 100 मंडळींची उपस्थिती होती.
अभिनेते शरद पोंक्षे नेहमी अंदमानात वीर सावरकरांची महती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी सहलीचे आयोजन करतात.
यावर्षी देखील अंदमानात 21 मार्चला शरद पोंक्षे आणि त्यांचे 100 सहप्रवासी पोहचले होते. पण वादळाची शक्यता वर्तवण्यात आली होती आणि पाऊसही सुरू झाला होता.
यामुळे एखादा समुद्रकिनारा बघायचा सोडून काश्मीर फाईल्स चित्रपट बघण्याचा निर्णय एकमुखाने झाला. यासाठी शब्दामृत प्रकाशनने पुढाकार घेतला.
अंदमानात या आधी कधीही कुण्या मराठी संस्थेने इतक्या मोठ्या प्रमाणात एखाद्या सिनेमाचा शो लावलेला नाही, हे अंदमानात पहिल्यांदा घडलं.
कश्मीर फाईल्स पाहिल्यानंतर सारे स्तब्ध आणि सुन्न झाले होते. सिनेमा संपल्यावर शरद पोंक्षेंनी चित्रपट आणि सध्याच्या हिंदूंच्या परिस्थितीवर भाष्य केले.
साधरणत: सिनेमागृहात सिनेमा सुरू होण्याच्या आधी राष्ट्रगीत म्हटले जाते, मात्र अंदमानात राष्ट्रगीत लावले जात नाही अशी प्रतिक्रिया अभिनेता शरद पोंक्षे यांनी दिली.
कश्मीर फाईल्स पाहून राष्ट्रभक्तीने भारवलेल्या मंडळींनी अंदमानातील सिनेमागृहात उस्फुर्तपणे राष्ट्रगीत गायले. हा व्हिडीओ सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यापर्यंत पोहोचला आणि त्यांनी तो ट्विट केले.