Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Photo : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील राहत्या घरी कुटुंबीयांसोबत धुळवड साजरी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील आपल्या राहत्या 'शुभदिप' या निवास्थानी कुटुंबीयांसोबत धुळवड साजरी केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी त्यांच्या पत्नी लताताई, मुलगा तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी देखील सहभाग घेतला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नातू रूद्र देखील या उत्सवात सहभागी झाला होता.
यावेळी मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रात अतिशय उत्साहात रंगपंचमी सुरू साजरी झाली असून होळी आणि रंगपंचमीच्या सगळ्यांना भरघोस शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्रातील जनतेचे संकट दूर होऊन आनंदाचे क्षण येऊदे अशी होळीला प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली.
ज्या भागात अवकाळी पाऊस पडून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नसून त्या भागातील सरकारी अधिकाऱ्यांना तात्काळ सर्वे करण्याचे आदेश दिले असून ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.
रंगपंचमी उत्सवाच्या निमित्ताने आज ठाणे येथील निवासस्थानी कुटुंबियांच्या साथीने रंग खेळण्याचा आनंद लुटला. याप्रसंगी नातू रुद्रांश याचा आनंद देखील गगनात मावेनासा झाला होता, असे ट्वीट मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
आनंद आश्रमात जमलेल्या शिवसैनिकांना शुभेच्छा देऊन त्यांच्यासोबत धूलिवंदनाचा सण ढोल ताशांच्या गजरात रंगाने न्हाऊन निघत, रंगांची उधळण करत दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा केला, असेही ट्विट मुख्यमंत्र्यांनी केले आहे.