Photo : कांद्याला दर नाही, सरकार लक्ष देत नाही, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गावच विकायला काढलं
कांदा पिकाला भाव मिळत नसल्याने राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्याची अवस्था दयनीय झालेली असताना देखील सरकारकडून कोणतीच पावले उचलली जात नसल्याने नागरिकांमधून संतापाच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंतापातून देवळा तालुक्यातील माळवाडीच्या शेतकऱ्यांनी चक्क आपलं गावच विकायला काढलं आहे. सरकारविरोधातील या अनोख्या आंदोलनाची आता राज्यभर चर्चा होत आहे.
कांदा पिकाला भाव मिळावा आणि सरकारने अनुदान जाहीर करावे या मागणीसाठी गळ्यात कांद्याची माळ घालून आंदोलनं झाली, निवेदने दिली, रास्तारोको केला, एवढंच काय तर कांद्याची होळी ही केली. तरीही सरकार लक्ष देत नसल्याने नाशिकच्या देवळा तालुक्यातील साडेतीन हजार लोकवस्तीचे माळवाडी गाव चक्क विकायला काढले आहे.
कांद्याचे दशावतार बघायला मिळत असल्याने कायमच रडण्यापेक्षा एकदाच काय तो निकाल लावावा यासाठी सरपंचासह ग्रामस्थांनी बैठक घेतली आणि एकमुखाने गाव विक्री करण्याचा ठराव केला.
गावातील साधारपणे साडेपाचशे हेक्टर जमीन आहे. जवळपास 90 टक्के लोक कांदा शेती करतात. उदरनिर्वाहचं साधनही कांदा शेतीच आहे. मात्र कांद्याला भावचं मिळत नाही. त्यामुळे रहायचे कसे? जगायचे कसे? असा प्रश्न शेतकरी विचारू लागले आहेत.
आत्महत्या करून कुटुंब वाऱ्यावर सोडण्यापेक्षा कसत असणाऱ्या शेतीसह गावच विक्रीला काढण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. केंद्र आणि राज्य सरकार या दोघांपैकी कोणीही गाव विकत घ्यावे, अशी त्यांची मागणी आहे.
सरकारने गाव विकत घ्यावे, शेती विकून आम्ही आमचा उदरनिर्वाह कसा करायचा ते बघू ,आज काहीच परवडत नाही, आत्महत्या करणार नाही. त्यामुळे सरकारने गाव विकत घ्यावे आणि आम्हाला पैसे द्यावे असा ग्राम सभेतही असा निर्णय घेणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
अवकाळी पावसाने कांदा पिकावर करपा रोग पडला आहे. कांदा बाजारात यायला अजून दीड ते दोन महिने आहे. तोपर्यंत कांद्याचे वजन आणि उत्पादन ही कमी होणार आहे.
40/50 हजार एकरी खर्च आजवर केलाय. पुढेही करावा लगा आहे. मात्र उत्पन्न खर्चा एवढे मिळणार नाही, आता शेती विकायची आणि दुसरा रोजगार शोधायचा. मुलांना ही शेतीपासून दूर ठेवयाचे, अशा भावना शेतकरी पंकज बागुल यांनी व्यक्त केल्या आहेत.