एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
09 बकऱ्या फस्त करणारा महाकाय अजगर पकडण्यास यश
तब्बल 09 बकऱ्या फस्त करणाऱ्या एका महाकाय अजगराला पकडण्यात चंद्रपूर जिल्ह्यात यश आलंय.
![तब्बल 09 बकऱ्या फस्त करणाऱ्या एका महाकाय अजगराला पकडण्यात चंद्रपूर जिल्ह्यात यश आलंय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/09/e434686cc7f80d120ab53d9d4dc820271665336641380265_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Chandrapur
1/10
![तब्बल 09 बकऱ्या फस्त करणाऱ्या एका महाकाय अजगराला पकडण्यात चंद्रपूर जिल्ह्यात यश आलंय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/09/578660e553e013968d53eafe401681ded5c74.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तब्बल 09 बकऱ्या फस्त करणाऱ्या एका महाकाय अजगराला पकडण्यात चंद्रपूर जिल्ह्यात यश आलंय.
2/10
![ब्रम्हपुरी तालुक्यातील उचली गावातून हा १२ फूट लांब अजगर पकडण्यात आलाय. गेल्या वर्षभरापासून उचली गावात या अजगराची मोठी दहशत होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/09/afd8ba54631eef301db4a309f8e03e3226586.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ब्रम्हपुरी तालुक्यातील उचली गावातून हा १२ फूट लांब अजगर पकडण्यात आलाय. गेल्या वर्षभरापासून उचली गावात या अजगराची मोठी दहशत होती.
3/10
![गावाच्या अगदी जवळ अजगराचा वावर असल्याने गावकरी शेतात जायला घाबरायचे, तसेच लहान मुलांना लगतच्या भागात जाण्यास प्रतिबंध करण्यात आला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/09/bbc7740a2af9d980cc2448c8b96e798ef8137.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गावाच्या अगदी जवळ अजगराचा वावर असल्याने गावकरी शेतात जायला घाबरायचे, तसेच लहान मुलांना लगतच्या भागात जाण्यास प्रतिबंध करण्यात आला होता.
4/10
![वर्षभरात या अजगराने एक-एक करत गावातील तब्बल 09 बकऱ्या फस्त केल्या होत्या. काल देखील या अजगराने मिनाक्षी ढोंगे या शेतकरी महिलेची बकरी फस्त केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/09/9c169930fdfd3a2396447c3ecba9a0600a28c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वर्षभरात या अजगराने एक-एक करत गावातील तब्बल 09 बकऱ्या फस्त केल्या होत्या. काल देखील या अजगराने मिनाक्षी ढोंगे या शेतकरी महिलेची बकरी फस्त केली.
5/10
![सदर माहिती अर्थ कंजरवेशन ऑर्गनायझेशन संस्थेचे अध्यक्ष श्री मनोज वठे यांना देण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/09/b04cd329254d7ab18bc829b03d6df30626b1a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सदर माहिती अर्थ कंजरवेशन ऑर्गनायझेशन संस्थेचे अध्यक्ष श्री मनोज वठे यांना देण्यात आली.
6/10
![माहिती मिळताच सर्पमित्र ललित उरकुडे, विवेक राखडे, चेतन राखडे व ईशान वठे यांनी घटनास्थळावर धाव घेतली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/09/c12cc199db2a1e8e27cc97d3b96a179037ee5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माहिती मिळताच सर्पमित्र ललित उरकुडे, विवेक राखडे, चेतन राखडे व ईशान वठे यांनी घटनास्थळावर धाव घेतली.
7/10
![मात्र अंधार व नाल्याची बाजू असल्याने सुरक्षित पणे अजगराला पकडण्यास अडचण होत होती तरीसुद्धा अर्थ कंजरवेशन ऑर्गनाझेशन या सर्पमित्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अतिशय शिताफीने या अजगराला जेरबंद केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/09/3da1bb2c393aa1bb5afba3c82471cb202ea87.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र अंधार व नाल्याची बाजू असल्याने सुरक्षित पणे अजगराला पकडण्यास अडचण होत होती तरीसुद्धा अर्थ कंजरवेशन ऑर्गनाझेशन या सर्पमित्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अतिशय शिताफीने या अजगराला जेरबंद केले.
8/10
![महाकाय अजगर जेरबंद झालेला बघून गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला व संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/09/870dddf1e7006d8765240d9835d6c8086f275.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महाकाय अजगर जेरबंद झालेला बघून गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला व संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले.
9/10
![हा अजगर तब्बल १२ फूट लांबीचा होता. विशेष म्हणजे या आकाराचा अजगर ब्रम्हपुरी भागात आढळल्याची ही पहिलीच नोंद आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/09/398ad0cb48014487e52dcd2709922ca6bc248.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हा अजगर तब्बल १२ फूट लांबीचा होता. विशेष म्हणजे या आकाराचा अजगर ब्रम्हपुरी भागात आढळल्याची ही पहिलीच नोंद आहे.
10/10
![अजगराला वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. सेमस्कर साहेब, वनरक्षक श्री. संभाजी बळदे यांच्या उपस्थितीत सुरक्षितपणे गुप्त स्थळी सोडून देण्यात आले. या बचाव कार्यात क्रिष्णा धोटे व गावचे पोलीस पाटील संघर्ष जगझापे यांचे विशेष सहकार्य लाभले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/09/90a5d6538470237b02944695bf6cfa9ae4e3e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अजगराला वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. सेमस्कर साहेब, वनरक्षक श्री. संभाजी बळदे यांच्या उपस्थितीत सुरक्षितपणे गुप्त स्थळी सोडून देण्यात आले. या बचाव कार्यात क्रिष्णा धोटे व गावचे पोलीस पाटील संघर्ष जगझापे यांचे विशेष सहकार्य लाभले.
Published at : 09 Oct 2022 11:01 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
जळगाव
महाराष्ट्र
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)