Bird Flu: सावधान! बर्ड फ्लूनं घाम फुटला, कावळ्यापाठोपाठ कोंबड्यांनाही लागण, प्रशासन करणार कोंबड्या नष्ट, धाराशिवात वाहतूकीवर निर्बंध

गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात बर्ड फ्लूचा (Bird flu) शिरकाव झालाय . धाराशिवच्या ढोकी गावात कावळ्यापाठोपाठ आता कोंबड्यांनाही बर्ड फ्लूची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय .
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले कोंबड्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे समोर आले आहे .

धाराशिवच्या ढोकी गावात काही दिवसांपूर्वी कावळे पटापट मरून पडल्याने प्रशासन सतर्क झाले होते .
परिसरातील 10 किलोमीटर त्रिज्येचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला होता .तसेच परिसरातील मास मटन विक्री बंद होती .
आता कावळ्यांपाठोपाठ कोंबड्यांनाही बर्ड फ्लू झाल्याचे समोर आल्यानंतर बर्ड फ्लू चा प्रसार रोखण्यासाठी या कोंबड्या नष्ट केल्या जाणार आहेत .कोंबड्यांच्या वाहतुकीवर निर्बंध टाकण्यात आले आहेत .
दरम्यान पहिल्या बर्ड्स लिव्हच्या संशयीत रुग्णाचा पुणे प्रयोगशाळेत पाठवलेला अहवाल निगेटिव्ह आल्याने गावकऱ्यांनी सुस्कारा सोडलाय .
बर्ड फ्लू चा H5N1हा विषाणू पक्षांपासून माणसालाही होऊ शकतो .त्यामुळे पोल्ट्री व्यवसायिकांच्या चिंतेत भर पडली आहे .तसेच मांसाहार करणाऱ्या गावकऱ्यांमध्ये ही भीतीचे वातावरण आहे .
बर्ड फ्लू ची लागण पक्षी किंवा बर्ड फ्लू ग्रस्त कोंबड्यांच्या विष्ठा किंवा लाळेतून हा प्रसार होऊ शकतो .
त्यामुळे सतत स्थलांतर करणाऱ्या पक्षांपासून तसेच लागण झालेल्या प्राण्यांपासून दूर राहणे महत्त्वाचे आहे .