धक्कादायक ! ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीमच्या कोनला बुरशी; ग्राहकाची पोलिसात तक्रार, मनसे रस्त्यावर
मुंबईतील अंधेरी पूर्वेत झेप्टो कंपनीकडून आईस्क्रीममध्ये फंगस लागलेले क्वॉर्नेटो कोन दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
MNS agitation against zepto company
1/7
मुंबईतील अंधेरी पूर्वेत झेप्टो कंपनीकडून आईस्क्रीममध्ये फंगस लागलेले क्वॉर्नेटो कोन दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
2/7
फंगस लागलेला आईस्क्रीम देणाऱ्या झेप्टो कंपनीविरोधात अंधेरीत मनसे आक्रमक झाली असून मनसेनं कंपनीच्या बाहेर आंदोलन केले.
3/7
अंधेरी पूर्वेत मरोळ परिसरामध्ये राहणारी निकिता चव्हाण यांनी झेप्टो कंपनीकडून हिंदुस्तान यूनिलिव्हर कंपनीची क्वॉर्नेटो डबल चॉकलेट आईस्क्रीम ऑनलाइन मागवली होती.
4/7
झेप्टो कंपनीने आईस्क्रीम घरी डिलिव्हरी केल्यानंतर आईस्क्रीममध्ये मोठ्या प्रमाणात फंगस निघाला आहे. त्यानंतर निकिता चव्हाण यांच्याकडून MIDC पोलीस स्टेशनमध्ये झेप्टो कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
5/7
खराब आईस्क्रीम डिलिव्हरी करणाऱ्या झेप्टो कंपनीला बंद करण्याची मागणी करत मनसेकडून झेप्टो कंपनी बाहेर आंदोलन करण्यात आले.
6/7
मनसे अंधेरी विधानसभा अध्यक्ष रोहन सावंत यांच्या माध्यमातून झेप्टो कंपनी विरोधात हे आंदोलन करण्यात आले.
7/7
या आंदोलनात मनसे कडून झेप्टो कंपनीवर प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करुन उत्पदन बंद करावे अन्यथा मनसे रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
Published at : 04 Mar 2025 07:51 PM (IST)
= 7">