Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bharat Jodo : विशेष महिला पदयात्रा, राहुल गांधींच्या हस्ते संविधानाचं वाटप; आज भारत जोडो यात्रेत काय-काय घडलं?
बुलढाण्यातील शेगावपासून सहा किलोमीटरवरील खेर्डी (ता. खामगाव) या छोट्याशा खेडेगावात भारत जोडोच्या स्वागतासाठी प्रत्येक दारात अशा सुबक रांगोळ्या कोरल्या होत्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहिलांची विशेष पदयात्रा काढून शनिवारी देशाच्या माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांची जयंती भारत जोडो यात्रेने मोठ्या उत्साहात साजरी केली.
संविधानाच्या एक लाख प्रती वाटण्याच्या अभियानाची सुरूवात काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्या हस्ते आज करण्यात आली.
अभिरा अभय गोंड या तीन वर्षांच्या मुलगी बालशिवाजी वेशभूषा करून तलवारीसह घोड्यावर बसली होती. बाजूला सहा मावळे होते.
राहुल गांधींसोबत शेगाव येथून महिला मोठ्याप्रमाणात सहभागी झाल्या.
काही महिलांनी भरजरी फेटे बांधले होते. तर काहींनी आकर्षक वेशभूषा केल्या होत्या.
यात्रा मार्गावर ग्रामीण भागात महिलावर्ग हजारोंच्या संख्येने स्वागतासाठी उभा होता.
काही ठिकाणी इंदिरा गांधी, महात्मा गांधी, पंडित नेहरू यांची वेशभूषा केलेली मुले इतिहासाची आठवण करून देत होते.
नांदुरा येथील शिवाजी हायस्कुलच्या मुलीचे लेझीम पथक बहारदार होते. तर खामगावच्या रुक्मिणी भजनी मंडळाने विठ्ठल रखुमाई देखाव्यात बेटी बचाव भजन सादर करत होत्या.
जलंब येथे दहा वाजता मोठ्या उत्साहात यात्रेचे स्वागत झाले. येथील शाळेच्या मुलांनी शाळेच्या बाहेर मैदानात स्वागतासाठी मोठी रांग लावली होती.