Bharat Jodo: भारत जोडोला आज उत्स्फुर्त प्रतिसाद, पाहा निवडक क्षणचित्रे
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरु केलेली भारत जोडो यात्रा आज अकोला जिल्ह्यातील पातूरमधून सुरूवात झाली. महाराष्ट्रातील यात्रेचा आज 11 वा दिवस होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराहुल गांधींच्या यात्रेला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. लहान मुलांपासून तरुण आणि वृद्ध लोक या यात्रेत उत्फुर्तपणे सहभागी होत आहेत.
जेष्ठ समाजसेविका मेधा पाटकर आज भारत जोडो यात्रेत नंदुरबार येथील आदिवासी बांधवांसोबत सहभागी झाल्या. काल राहुल गांधी यांच्या सोबत त्यांची एक तास वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाली.
या यात्रेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव सहभागी झाले. त्यांनी यात्रेदरम्यान राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये आज वेगवेगळे पारंपारिक नृत्य आणि त्याचे वेगवेगळे रंग पाहायला मिळाले. आज नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधव आपले पारंपारिक नृत्य सादर करत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते.
भारत जोडो पदयात्रा दुपारनंतर बाळापूर तालूक्यातातील वाडेगावात पोहेचली. स्वातंत्र्य संग्राम चळवळीत या गावानं तब्बल 150 स्वातंत्र्यसैनिक दिले आहेत. यातूनच महात्मा गांधींची मोठी सभा 18 नोव्हेंबर 1933 ला वाडेगावात झाली होती.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे शुक्रवारी सायंकाळी राहुल गांधींची जंगी सभा होणार आहे. उद्या राहुल गांधी शेगावातील संत गजानन महाराजांच्या समाधीच दर्शन घेऊन येथील सभेला संबोधित करणार आहेत.
या सभेची आता तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या सभेला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. त्यामुळं सभेच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला आहे.
आज राहुल गांधी यांचा मुक्काम अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील बाग फाटा येथे असणार आहे.
सर्व फोटो ट्विटर भारत जोडो @bharatjodo