PHOTO : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये महाराष्ट्रातील 'या' ठिकाणांना भेट द्यायला हवीच!
लोणार सरोवर - बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या लोणार सरोवराची निर्मीती नैसर्गिक घटनेमुळे म्हणजेच उल्कापातामुळे झालेली असल्याचं बोललं जातं. लोणार सरोवर हे एक निसर्ग निर्मित पर्यटन स्थळ असल्यामूळे येथे निसर्ग प्रेमी व देश-विदेशातील पर्यटक आवर्जून भेट देत असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजव्हारमध्ये हनुमान पॉइंट हे एक अतिशय सुंदर नैसर्गिक पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणाहून या टेकड्यांचे भव्य दृश्य पाहून तुमचे मन मोहून जाईल
जव्हारमध्ये असलेल्या जय विलास पॅलेसला नक्की भेट द्यायला हवी. उंच टेकडीवर असलेला हा राजवाडा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे
जव्हारपासून हाकेच्या अंतरावर असलेला काळमांडवी धबधबा हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. या ठिकाणाला अनेक लोक कल मांडवी धबधबा म्हणूनही ओळखतात.
अजिंठा लेणी जगप्रसिद्ध लेणी आहे. हजारो वर्ष जुन्या असलेल्या या लेणीला भेट देण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येत असतात.
कास पठार विविध प्रकारच्या फुलांसाठी ओळखले जाते. वेगवेगळ्या फूलांचा आनंद जर घ्यायचा असेल तर एक वेळेस सातारा जिल्हात असलेल्या कास पठाराला भेट द्यायलाच पाहिजे.
लोणावळा हे एक पुणे जिल्ह्यातील व सह्याद्री पर्वत रांगेच्या कुशीत असलेलं पर्यटन स्थळ आहे. हे एक महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आहे.
माथेरान भारतातील सर्वात लहान हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते. रायगड जिल्ह्यात असलेल्या कर्जत तालुक्यातील हे ठिकाण पर्यटकांच आकर्षण बनलेलं आहे.