09 बकऱ्या फस्त करणारा महाकाय अजगर पकडण्यास यश
तब्बल 09 बकऱ्या फस्त करणाऱ्या एका महाकाय अजगराला पकडण्यात चंद्रपूर जिल्ह्यात यश आलंय.
Chandrapur
1/10
तब्बल 09 बकऱ्या फस्त करणाऱ्या एका महाकाय अजगराला पकडण्यात चंद्रपूर जिल्ह्यात यश आलंय.
2/10
ब्रम्हपुरी तालुक्यातील उचली गावातून हा १२ फूट लांब अजगर पकडण्यात आलाय. गेल्या वर्षभरापासून उचली गावात या अजगराची मोठी दहशत होती.
3/10
गावाच्या अगदी जवळ अजगराचा वावर असल्याने गावकरी शेतात जायला घाबरायचे, तसेच लहान मुलांना लगतच्या भागात जाण्यास प्रतिबंध करण्यात आला होता.
4/10
वर्षभरात या अजगराने एक-एक करत गावातील तब्बल 09 बकऱ्या फस्त केल्या होत्या. काल देखील या अजगराने मिनाक्षी ढोंगे या शेतकरी महिलेची बकरी फस्त केली.
5/10
सदर माहिती अर्थ कंजरवेशन ऑर्गनायझेशन संस्थेचे अध्यक्ष श्री मनोज वठे यांना देण्यात आली.
6/10
माहिती मिळताच सर्पमित्र ललित उरकुडे, विवेक राखडे, चेतन राखडे व ईशान वठे यांनी घटनास्थळावर धाव घेतली.
7/10
मात्र अंधार व नाल्याची बाजू असल्याने सुरक्षित पणे अजगराला पकडण्यास अडचण होत होती तरीसुद्धा अर्थ कंजरवेशन ऑर्गनाझेशन या सर्पमित्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अतिशय शिताफीने या अजगराला जेरबंद केले.
8/10
महाकाय अजगर जेरबंद झालेला बघून गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला व संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले.
9/10
हा अजगर तब्बल १२ फूट लांबीचा होता. विशेष म्हणजे या आकाराचा अजगर ब्रम्हपुरी भागात आढळल्याची ही पहिलीच नोंद आहे.
10/10
अजगराला वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. सेमस्कर साहेब, वनरक्षक श्री. संभाजी बळदे यांच्या उपस्थितीत सुरक्षितपणे गुप्त स्थळी सोडून देण्यात आले. या बचाव कार्यात क्रिष्णा धोटे व गावचे पोलीस पाटील संघर्ष जगझापे यांचे विशेष सहकार्य लाभले.
Published at : 09 Oct 2022 11:01 PM (IST)