Beed: बीडमध्ये स्त्री-भ्रूण हत्येचा परिणाम, मुलींचा जन्मदर घटला; 1000 मुलांमागे केवळ 865 मुली
बीड जिल्ह्यात मुलींचा जन्मदर घसरल्याचे पुन्हा एकदा समोर आलंय. जिल्ह्यात हजार मुलांमागे केवळ 865 मुली आहेत. काही दिवसांपूर्वी स्त्री भ्रूण हत्येानं हादरला होता जिल्हा.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजिल्ह्यात 2023 आणि 2024 मध्ये अवैध गर्भलिंग निदान करून गर्भपात केल्याचा प्रकार उघड झाला होता. त्यातील आरोपींनी जालना आणि छत्रपती संभाजी नगरमध्ये गर्भलिंग निदान केल्याचा परिणाम थेट मुलींच्या जन्मदरावर झाल्याचं समोर आले आहे.
2012 मध्ये परळीतील अवैध गर्भलिंग निदान प्रकरण देशात गाजले. यातील डॉक्टर सुदाम मुंडेला शिक्षा देखील झाली. 2012 मध्ये जन्मदर हजारामागे केवळ 797 एवढा होता.
पीसीपीएनडीटी कायदा कठोर करण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील जन्मदर वाढून 2019 मध्ये तो 961 वर पोहोचल्याचा परिणाम दिसून आला.
मात्र, त्यानंतर पुन्हा अवैध गर्भलिंग निदान प्रकरण सुरू असल्याचे समोर आलं. त्यामुळे हा जन्मदर पुन्हा 865 वर आलाय.
बीड जिल्ह्यातील मुलींचे कमी झालेले प्रमाण व जन्मदर रोखण्यासाठी अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्या रॅकेटवर कार्यवाहीची अपेक्षा केली जाते आहे.
दरम्यान, एकीकडे संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन बीड जिल्ह्यात वातावरण तापलं असून येथील गुन्हेगारीच्या घटनांवर प्रकाश टाकला जात आहे.