In Pics : औरंगाबादच्या ‘रँचो’ची भन्नाट आयडिया; एकच बाईक पेट्रोल अन् बॅटरीवर चालणार

सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक मोटारसायकल येत आहेत. बाईकचे प्रमाण वाढले असले तरी अद्याप आपल्याकडे चॅर्जिंग स्टेशन तितके उपलब्ध नाहीत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बाईक चालवत असनाता मध्येच जर चार्जिंग संपली अथवा बॅटरीमध्ये काही अडचण निर्माण झाली तर काय करायचं? असा प्रश्न प्रत्येकासमोर उपस्थित राहतो. याचे उत्तर औरंगाबादमधील एका तरुणाने शोधले आहे.

औरंगाबादच्या या रँचोची सध्या मराठवाड्यात चांगलीच चर्चा सुरु झाली आहे.
औरंगाबादमधील अफरोज शेख या तरुणाने एकाच बाईकमध्ये बॅटरी आणि पेट्रोल असा दुहेरी संगम साधला आहे.
बॅटरी संपली तर पेट्रोलचा वापर अन् पेट्रोल संपले तर बॅटरी... अशी दुचाकी त्याने तयार केली आहे.
यासाठी त्याला 17 हजार रुपयांचा खर्च आला आहे.
अफरोज शेख याने तयार केलेल्या या बाईक इलेक्ट्रिक बाईक म्हणू शकतात आणि पेट्रोलही बाईकही.
औरंगाबादच्या या पठ्याने अशी भन्नाट बाईक बनवली आहे.
अफरोजने भंगारातून तीन हजार रुपयांना एक बाईक विकत घेतली होती. या गाडीवर त्याने 17 हजार रुपयांचा खर्च केला.