Happy Birthday Aditya Thackeray : कलाविश्वापासून राजकारणापर्यंत, कायम चर्चेत असणारे आदित्य ठाकरे
छाया सौजन्य - सोशल मीडिया
1/6
ठाकरे कुटुंबातूनच राजकारणाचा वारसा मिळालेल्या आदित्य ठाकरे यांनी कायमच सर्वांचं लक्ष वेधलं.
2/6
मंत्रीपदाशी शपथ घेणं असो किंवा मग दसरा मेळाव्याच्या वेळी उभ्या महाराष्ट्रापुढं नतमस्तक होणं असो. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हा नातू फार कमी वयातच राज्याच्या कारभारातही मोलाचा वाटा उचलू लागला.
3/6
वडिलांना मिळालेलं मुख्यमंत्रीपद आणि आपल्या वाट्याला आलेलं पर्यावरण मंत्रीपद या दोन्ही पदांचा मान राखत कायमच आदित्य ठाकरे यांनी जनमानसातही आपलं भक्कम स्थान निर्माण केलं.
4/6
विकासकामांची पाहणी करणं असो किंवा एखादा नव्या संकल्पनेचा उपक्रम राबवणं असो, आदित्य ठाकरे यांनी कायमच नव्या संकल्पना, तरुणाईची विचारसरणी या गोष्टींनाही आपल्या कामात प्राधान्य दिलं आहे.
5/6
राजकीय वर्तुळात त्यांचा वावर कायमच चर्चेत असतो. कलाविश्वातही त्यांचे अनेक मित्रमैत्रीणी असल्यामुळं तिथेही आदित्य ठाकरे हे नाव कुणासाठी नवं नाही.
6/6
अशा या तरुणाईचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. (सर्व छायाचित्रे- सौजन्य - आदित्य ठाकरे इन्स्टाग्राम/ फेसबुक)
Published at : 13 Jun 2021 07:37 AM (IST)