Ashadhi Wari : हरिभक्तीच्या खेळात वैष्णव दंगला, पुरंदावडेत माऊलींच्या रिंगणातील काही मोहक क्षण
माऊली... माऊलीच्या नामघोषात ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रंगण पुरंदावडे येथे पार पडले
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरिंगण मैदानाला प्रदक्षिणा करून दिंड्यादिंड्यांमधून पाऊले खेळत नामघोष सुरू होता
माऊलींच्या अश्वाने दौडण्यास सुरवात करताच लाखो उपस्थितांनी टाळ्या वाजवत माऊली... माऊली...चा गजर सुरू केला
रिंगण पूर्ण होताच उपस्थितांनी अश्वाच्या टाचेखालची माती कपाळी लावण्यासाठी एकच झुंबड उडाली होती.
पालखी सोहळ्याची रिंगण सोहळा याची देही याची डोळा अनुभवताना वारकऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले
अवघ्या काही दिवसांवर आषाढी आली आहे आणि पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढत आहे.
दरम्यान रिंगण सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी जिल्ह्यातून भाविकांनी गर्दी केली
यावेळी रिंगण सोहळ्यातील वायुवेगाने धावणारे अश्वमेध, टाळ-मृदुंगाच्या भक्ती सागरात तल्लीन झालेले वारकरी, माऊलीचा जयघोष हे सर्व डोळ्यात साठवून ठेवणारे चित्र विलोभनीय होते
टाळ मृदुगाच्या एकाच तालात आणि एकाच लयित वारकरी नाचू लागतात. यानंतर दिंडीतील अश्व गोलाकार फिरत पालखीला प्रदक्षिणा मारतात. अशा पद्धतीने हा रिंगण सोहळा पार पडतो. (Photo -Credit - raviraj wani.. akluj)