Cyclone Biporjoy: केरळात मान्सून दाखल; महाराष्ट्रात कधी? 'बिपोरजॉय' चक्रीवादळ अडवणार का मान्सूनची वाट? पाहा...
'बिपोरजॉय' या चक्रीवादळाचा मान्सूनच्या तीव्रतेवर परिणाम होत असून केरळमध्ये झालेली पावसाची सुरुवात सौम्य असेल, असं हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहवामान खात्याच्या अंदाजानुसार, हे वादळ अवघ्या 48 तासांत चक्रीवादळातून तीव्र चक्रीवादळात रुपांतरित होणार आहे. परिस्थितीप्रमाणे, 12 जूनपर्यंत हे चक्रीवादळ तीव्र स्वरुपाचं असेल.
नैऋत्य मान्सून साधारणपणे 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो. यावेळी मान्सून 8 जून रोजी केरळात पोहोचला.
पुण्यात संध्याकाळच्या वेळी पावसाचं आगमन झालं आहे. कोकणात 16 जूननंतर मान्सून दाखल होईल, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पण आता चक्रीवादळ मान्सूनची वाट अडवणार का? याकडे देखील हवामान विभागाचं लक्ष लागलं आहे.
विदर्भात पुढचे तीन दिवस मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर, मुंबई शहरात मात्र कमालीची उष्णता वाढली आहे.
बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात चक्रीवादळांची तीव्रता वाढत असून हवामान बदलामुळे ते दीर्घकाळ सक्रिय राहू शकते, असं हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, हे वादळ उत्तरेकडे सरकून अतिशय तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. यानंतर, पुढील तीन दिवसांत ते उत्तर-वायव्य दिशेने सरकेल. मात्र, भारत, ओमान, इराण आणि पाकिस्तानसह अरबी समुद्राला लागून असलेल्या देशांवर वादळाचा मोठा परिणाम होईल, असं अद्याप तरी आयएमडीने व्यक्त केलेलं नाही.
image 5
अरबी समुद्रात चक्रीवादळांच्या संख्येत 52 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, अत्यंत तीव्र चक्रीवादळं 150 टक्क्यांनी वाढली आहेत. हवामानशास्त्रज्ञ रॉक्सी मॅथ्यू कोल यांच्या म्हणण्यानुसार, अरबी समुद्रातील वाढत्या चक्रीवादळामुळे महासागरांच्या तापमानात वाढ आणि जागतिक तापमान वाढ होत आहे. अरबी समुद्र पूर्वी थंड असायचा, पण आता तो उबदार आहे.