आषाढी वारी करून संत गजानन महाराजांची पालखी आज शेगावात विसवणार; दिंडीत लाखो वारकऱ्यांची मांदियाळी
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे गेलेली संत गजानन महाराजांची पालखी आज शेगाव येथे विसावणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज सकाळी ही पालखी खामगाव येथून शेगावकडे रवाना झालीय.
अंतिम टप्प्यात असलेल्या या पालखीसोबत राज्यभरातून आलेल्या जवळपास अडीच लाख भाविकांनी सहभाग नोंदवलाय.
बुलढाणा जिल्ह्यात काल रात्रीपासून सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे.
मात्र भर पावसात सुमारे अडीच लाख भाविक संत गजानन महाराजांच्या पालखी सोबत पायी चालत आहे.
भर पावसात भाविकांमध्ये मोठा उत्साह आहे.
साधारणतः सायंकाळी चार वाजता पालखी शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात विसरणार आहे.
दरम्यान, अंतिम टप्प्यातील खामगाव ते शेगाव या वीस किलोमीटरच्या मार्गावर जवळपास दोन ते तीन लाख भाविक भर पावसात पायी चालत आहे.
भर पावसात अतिशय उत्साहात दोन ते तीन लाख भाविक पालखी सोबत चालत आहे.
या भाविकांच्या स्वागतासाठी आणि सुरक्षेसाठी खामगावचे आमदार आकाश फुंडकर हे स्वतः पालखी मार्गावर भाविकांचे स्वागत करत आहे.