अवघे गरजे पंढरपूर... वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पंढरी सजली; विठुरायाच्या राऊळीला आकर्षक रोषणाई
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात जय्यत तयारी सुरू झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविठ्ठल मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
वारकऱ्यांच्या स्वागतासाठी विठुरायाची पंढरी सजली असल्याचं दृश्य सध्या पंढरपुरात पाहायला मिळत आहे.
त्याशिवाय राज्यभरातून आषाढीसाठी लाखोंच्या संख्येनं वारकरी पंढरपुरात दाखल होत असतात.
वारकऱ्यांच्या सोयीसाठी अनेक उपाययोजना पंढरपुरात करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रभरातून पालख्या पंढरीच्या दिशेनं निघाल्या आहेत.
आपल्या लाडक्या विठुच्या दर्शनासाठी वारकरी आतूर झाले आहेत.
विठ्ठल भेटीच्या ओढीनं पंढरीच्या दिशेनं भराभर पावलं टाकत वारकरी मार्गक्रमण करत आहेत.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत एकनाथ, संत मुक्ताई यांसारख्या अनेक पालख्या राज्यभरातून पंढरीला जाण्यासाठी निघाल्या आहेत.
पंढरीला जाऊन युगानयुगे विटेवरी उभ्या असलेल्या विठ्ठलाच्या भेटीसाठी आतूर झालेला वारकरी ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता पायी प्रवास करत आहे.
(PHOTO : ABP Majha Beuro)