Photo News : एक जांभूळ दहा रुपयाला; किलोचा दर चारशे रुपयांवर
आंब्यापेक्षा जांभळं महाग झाले आहेत. विशेष म्हणजे एक जांभूळ दहा रुपयाला मिळत असून, किलोचा दर चारशे रुपयांवर पोहचला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळे जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांना यंदा मोठा दिलासा मिळत आहे.
विशेष म्हणजे यावेळी झालेल्या परतीच्या पावसाचा मोठा फटका जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांना बसल्याने आवक देखील कमी झाली आहे. त्यामुळे यंदा जांभूळाला चांगला दर मिळत आहे.
काळेभोर जांभळं डोळ्यासमोर आलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. मात्र आता त्याच जांभळाला सोन्याचा दर मिळतोय असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही.
त्याचं कारण म्हणजे जांभळाला एका किलोचा भाव हा चारशे रुपयेपर्यंत झाला आहे. विशेष म्हणजे एक किलोमध्ये येणाऱ्या जांभळांची संख्या पाहिली तर एक जांभूळ दहा रुपयाला पडतोय.
छत्रपती संभाजीनगर शहरातील गुलमंडीवर विक्रीसाठी आलेल्या दोन टोपल्या प्रत्येकी 16 हजार रुपयाला विकत आहेत. महत्वाचे म्हणजे एवढा दर असून देखील ही जांभळं तासाभरात हातोहात विकतायत.
छत्रपती संभाजीनगर शहरातील जाधव मंडीत सद्या जांभळाला एका किलोचा भाव हा चारशे रुपये मिळत आहे.
विशेष म्हणजे यंदा जांभळाची आवक कमी झाली आहे. त्याचे कारण म्हणजे परतीच्या पावसामुळे झाडाला लागलेल्या बारचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले.
त्यात जोरदार वारा असल्याने बार गळून पडला होता. त्यामुळे बाजारात जांभळाची आवक कमी झाली आहे. त्यातच गावरान जांभूळ बाजारात येण्यासाठी आणखी एखाद्या आठवड्याचा वेळ आहे.
त्यामुळे सद्या बाजारात उपलब्ध असलेल्या जांभळाला चांगले दर मिळत आहे.