Ashadhi Wari 2022: ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं उद्या प्रस्थान; आळंदी नगरी दुमदुमली
शिवानी पांढरे
Updated at:
20 Jun 2022 12:03 PM (IST)
1
Ashadhi Wari 2022: यंदाच्या आषाढ वारीसाठी आळंदी नगरी सजली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी लाखो वारकरी विठूनामाचा गजर करत देहू आळंदीत दाखल झाले आहेत.
3
उद्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार असल्याने आळंदीच्या घाटावर वारकरी जमले आहे.
4
दोन वर्षांनंतर पायी वारी होणार असल्याने बाजारपेठा गजबजल्या आहे.
5
सहकुटुंब सहपरिवार आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहेत. आळंदीच्या घाटावरच अनेकांनी विसावा घेतला आहे.
6
तब्बल दोन वर्षांनंतर आळंदीची दिवाळी साजरी होणार असल्याचं नागरीकांचं मत आहे.
7
दोन वर्ष पंढरीची आस लागलेले वारकरी यंदा पांडुरंगाच्या दारी जाणार आहे. त्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यार उत्साह आहे.