PHOTO : संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दुपारी दोन वाजता प्रस्थान सोहळा पार पडेल.
मुख्य मंदिर, पालखी अन् रथ फुलांनी सजवण्यात आला आहे.
इंद्रायणी नदीच्या काठी वारकऱ्यांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.
सकाळपासूनच ठिकठिकाणी वैष्णवांचा मेळा भरला आहे.
दोन वर्षानंतर पायी सोहळा होत असल्याने वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह आहे.
संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात रथाच्या पुढे धावण्याचा मान यंदा डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या बलराज या अश्वाला मिळाला आहे.
मुस्लीम बांधवांच्या हस्ते या रथाला चकाकी देण्यात आली आहे.
यंदा तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात 329 दिंडी सहभागी होणार आहेत.
वारी करुन पालखी 9 जुलैला पंढरपुरात दाखल होणार असून 10 जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होईल.