PHOTO: तुळशीची माळ आणि पांडुरंगाचं अतूट नातं! चायना माळेपुढे खरी तुळशीमाळ कशी ओळखाल?
विठुरायाच्या गळ्यात तुळशीहार आणि वारकऱ्याच्या गळ्यात तुळशीमाळ.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेव आणि भक्तांचे हे अनोखे नाते गेल्या शेकडो वर्षांपासून चालत आलेले आहे. ग
ळ्यात तुळशीचीमाळ हीच वारकऱ्यांची ओळख असते. विठुरायाला प्रिय असणाऱ्या तुळशीच्या लाकडापासून ही 108 मण्यांची तुळशीमाळ बनते. मात्र सध्या वारकऱ्यांना खऱ्या तुळशीमाळेऐवजी चायना माळ दिली जात आहे. वारकरी खऱ्या तुळशीऐवजी चायना माळ घेताना दिसत आहेत. खरी तुळशीमाळ कशी ओळखावी हे वारकरी संप्रदायापुढे सध्या सर्वात मोठे कोडे बनले आहे.
वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने तुळशीमाळ म्हणजे जगण्याचे अगाध तत्वज्ञान असते याच भावनेतून जसे स्त्रियांची ओळख मंगळसूत्राने होते तसेच वैष्णवांची ओळख या तुळशीमाळेने होते. देवाला तुळशी प्रिय म्हणूनच त्याच औषधी तुळशीच्या लाकडापासून बनविलेली माळ ही वारकऱ्यांचे दैवत असते. पंढरपूरमध्ये ही माळ गळ्यात घालून वारकरी संप्रदायात प्रवेश करता येतो म्हणून या माळेला इथे विशेष महत्व असते. अंगणात तुळसीची पूजा केली जाते.त्यामुळे घरातील वातावरण शुद्ध आणि पवित्र राहते. ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. माणसाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. त्याच प्रमाणे तुळशीची माळ धारण केल्याने पापे नष्ट होतात अशी भागवत धर्मात धारणा आहे. वारकरी संप्रदायाला माळकरी संप्रदाय असेही संबोधले जाते. या संप्रदायामध्ये तुळशीच्या 108 मण्यांची माळ घातल्या खेरीज कोणालाही वारकरी होता येत नाही. तुळशीची माळ घालणे म्हणजे एक नवा आध्यात्मिक जन्म घेणे असे मानले जाते.
हातापासून बनविलेल्या तुळशीच्या लाकडाच्या माळा तयार झाल्यावर त्यांच्या मण्याला लहान होल असते.
मात्र कोणत्याही लाकडापासून मशीनवर बनविलेल्या तुळशी माळेच्या मण्याला मोठे होल असते.
सर्वसाधारण जुन्या पिढीतील वारकऱ्यांना याची चांगली ओळख असते.
मात्र नवीन पिढीतील वारकऱ्यांसाठी खऱ्या तुळशीमाळेची ओळख समजून घेणे गरजेचे असते.
पंढरपूरमध्ये शेकडो वर्षांपासून येथील काशीकापडी समाज तुळशीमाळा बनवण्याचा व्यवसाय करत आला आहे.
तुळसीच्या लाकडाचे तुकडे राट नावाच्या यंत्रावर कातून त्यांचे मणी बनविण्याची कला या समाजातील लहान लहान मुलांनाही अवगत आहे. हा समाज वर्षभर तुळशीमाळ बनविण्याचा व्यवसाय करीत असतो.