Ashadhi Ekadashi Pandharpur: गळ्यात उपरणं, हातात टाळ, विठु नामाचा गजर; फुगडी अन् वारकऱ्यांसह धरला फेर, मुख्यमंत्री शिंदे वैष्णवांच्या मेळ्यात तल्लीन
Ashadhi Ekadashi 2024: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ तसेच पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या वतीने गेल्या 14 वर्षांपासून सुरू असलेल्या पर्यावरणाची 'वारी पंढरीच्या दारी' या उपक्रमाची पंढरपूर येथे यशस्वी सांगता झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या काही वर्षात पर्यावरणात झालेल्या बदलांचा फटका आपल्याला बसतो आहे.
पाऊस कमी आणि तापमान जास्त अशी परिस्थिती होऊ लागली आहे. त्यामुळे पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी असल्याचे मत यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
वाढते तापमान नियंत्रणात आणण्यासाठी वृक्ष लागवड हा एकच पर्याय असून ती काळाची गरज आहे त्यामुळे राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात 1 लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले.
बहुउपयोगी वृक्ष असलेल्या बांबू लागवडीला प्राधान्य दिले असून राज्यात 20 लाख हेक्टरवर बांबू लागवड करण्यात येत आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
'एक वारकरी एक झाड' हा अभिनव उपक्रम देखील राबविण्यात येणार असून वारीतील पालखी मार्गावर अधिकाधिक वृक्ष लागवड व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे.
तसेच मिलेट्सची लागवड वाढवण्यासाठी लातूर जिल्ह्यात मिलेट्स क्लस्टर देखील आपण करत असल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितले.
'पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी' या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व लोक कलावंतांना आणि मान्यवरांना यावेळी गौरविण्यात आले.
तसेच यानिमित्ताने एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांसह फेर धरला आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह फुगडी देखील घातली.