PHOTO | घराच्या भिंतीवर साकारली रामायण वारली चित्रकला!
अमरावती इथे राहणाऱ्या भाग्यश्री पटवर्धन यांनी आपल्या घराच्या भिंतीवर संपूर्ण रामायण वारली चित्रकला काढली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयासाठी 15 दिवस लागले असून यामध्ये दशावतार, चैत्रागंण आणि विविध पैलू काढले आहेत.
भाग्यश्री या ट्रॅव्हल फोटोग्राफर आणि चित्रकार आहेत. लहानपणापासून त्यांना चित्र काढण्याची आवड होती.
फेब्रुवारी महिन्यापासून अमरावतीत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने अनेकांनी घरात राहून साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य केलं. त्यातले पटवर्धन कुटुंब.
अमरावतीत राज्यातील पहिला लॉकडाऊन लागला होता. अशावेळी घरात करायचं काय ही चिंता भाग्यश्रीला सतावत होती.
अख्खं कुटुंब ते घराच्या अंगणात असलेल्या गार्डनमध्ये घालवतात. तेव्हाच भाग्यश्रीला घराच्या भिंतीवर नजर गेली आणि तिला ही आयडिया सुचली.
भाग्यश्री या रामभक्त असल्याने त्यांनी रामायण चित्र काढायचं सुचलं आणि त्यांनी काम सुरु केलं.
15 दिवसात त्यांनी आपल्या घराच्या भिंतीवर अप्रतिम रामायण वारली चित्रकला काढली आहे.
रामनवमीच्या भाग्यश्री यांनी हे काम पूर्ण केल्याने कुटुंबही आनंदित आहे.
भाग्यश्रीने वारली पेटिंगमध्ये रामायण, दशावतार आणि चैत्रांगण काढले आहे.
याशिवाय रामायणमधले वेगवेगळे प्रसंग काढले आहेत. ज्यात रामजन्म, सीता स्वयंवर, वनवास, सीता हरण, लक्ष्मणरेषा, जटायूचे रावणासोबत युद्ध, हनुमान भेट, कुंभकर्ण युद्ध, इंद्रजीत-मेघनाथ युद्ध, संजीवनी पर्वत, राम सेतू, राम-रावण युद्धचा समावेश आहे.