PHOTO : E-Pass कसा काढायचा? जाणून घ्या अगदी सोप्या पद्धतीनं...
ई- पास मिळवण्यासाठी सर्वप्रथम, https://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appज्यानंतर इथं 'apply for pass here' या पर्यायावर क्लिक करावं.
आवश्यक कागदपत्र इथं जोडावीत. प्रवास करण्यासाठीचं अत्यावश्यक कारणही नमूद करावं.
200 KB साईजच्या आतील इमेज अपलोड करा. कागदपत्र अपलोड करताना सर्व माहिती तपशील एकाच डॉक्युमेंटमध्ये घेऊन तो अपलोड करावा.
सबमिट क्लिक करुन तुमचा अर्ज दाखल करा.
अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक टोकन आयडी देण्यात येईल. तो सेव्ह करुन अर्ज नेमका कोणत्या प्रक्रियेत आहे हे तुम्ही जाणू शकता. थोडक्यात या माध्यमातून तुम्हाला अर्जाचं स्टेटस तपासता येईल.
पडताळणी आणि आवश्यक विभागांची परवानगी मिळाल्यानंतर तुम्ही तोच टोकन आयडी वापरुन ई- पास डाऊनलोड करु शकता. या ई पासमध्ये तुमची माहिती, वाहनाचा क्रमांक, पासचा वैधता कालावधी आणि क्यूआर कोड असेल.
प्रवास करतेवेळी पासची मुळ प्रत आणि त्याची सॉफ्ट कॉपीही सोबत बाळगा. जेणेकरुन पोलिसांनी विचारलं असता त्यांना हा पास दाखवता येऊ शकतो.