PHOTO : नारायण राणेंना अटक ते जामीन, क्रोनोलॉजी समजून घ्या
सोमवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांविरोधात एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि मंगळवारी त्यावरुन राजकीय धुरळा उडाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिक शहराचे शिवसेनेचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीनंतर नारायण राणेंविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांच्या अटकेचे आदेश काढले.
मंगळवारी युवासेनेच्या वतीनं राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली. अनेक ठिकाणी नारायण राणेंच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले तर मुंबईतील जुहू या त्यांच्या बंगल्यासमोर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठी निदर्शनं केली.
मी कोणताही गुन्हा केलेला नाही, माझं वक्तव्य हे गुन्हा नोंदवण्याचं वक्तव्य नाही, कोणत्याही गुन्ह्याची मला कल्पना नाही, त्यामुळे ऐकीव माहितीवर मी बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली.
नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा संगमेश्वर येथे असताना रत्नागिरी पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. नारायण राणेंना अटक करण्यापूर्वी रत्नागिरी पोलीस अधिक्षकांनी सुमारे तासभर नारायण राणेशी चर्चा केली.
दरम्यानच्या काळात नारायण राणे यांनी अटकपूर्व जामीन अर्जासाठी रत्नागिरी सत्र न्यायालयात अर्ज केला होता, पण सत्र न्यायालयाने तो फेटाळला. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात नारायण राणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. पण त्यावर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला
पोलिसांनी महाड कोर्टासमोर राणेंना उपस्थित करण्यासंबंधी कायदेशीर बाबींचा चाचपणी करण्यास केली. रात्री उशीरा नारायण राणेंना जामीन मिळाला.
नारायण राणेंना अटक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनआशीर्वाद यात्रेला महाराष्ट्रात अटकाव केल्याचा संदेश जाणार आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध नारायण राणे या नंतर आता शिवसेना विरुध्द पंतप्रधान मोदी असा दुसरा अंक सुरु होणार आहे.