In Pics : रत्नागिरी, रायगडमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आर्मी, नेव्ही, एअरफोर्स दाखल
रत्नागिरी आणि रायगड परिसरात पुरामुळे परिस्थिती बिकट बनली आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे. आता फक्त जीव वाचवण्यासाठी धडपड सुरु आहे. चहुबाजूने पाणी असल्याने पाण्यात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स तीनही दलांना पाचरण करण्यात आलं आहे. (photo tweeted by @IAF_MCC)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुरात अडकलेल्या लोकांच्या मदतकार्यासाठी एनडीआरएफ,आर्मीची पथके, हवाई दलआणि नौदल दाखल झालं आहे. (photo tweeted by @IaSouthern)
पुण्याहून आर्मीची पथके रत्नागिरीकडे रवाना झाली आहेत. तर नौदलाची पथकं कालच दाखल झाली आहे. (photo tweeted by @IaSouthern)
पूरात अडकेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे तसेच वैद्यकिय मदतीसाठी रवाना झाले आहे. एका हेलिकॉप्टरने चिपळूणहून अडकलेल्या दोन लोकांना बाहेर काढले तर दुसर्या हेलिकॉप्टरने 10 जणांना बाहेर काढल्याची माहिती हवाई दलाने दिली आहे. (photo tweeted by @IAF_MCC)
हवाईदलाने 17 हेलिकॉप्टर्स मदतीसाठी पाठवले असून नौदलाची चिपळूणमध्ये पाच, महाडमध्ये दोन पथकं दाखल झाली आहेत. (photo tweeted by @IAF_MCC)
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आज सकाळी पुण्यातील औंध मिल्ट्री स्टेशन आणि इंजिनिअरिंग टास्क फोर्स बीईजी सेंटर येथून लष्कराच्या 14 टास्क फोर्स रत्नागिरीसाठी रवाना झाल्या आहेत. (photo tweeted by @IaSouthern)
लष्कराने पूरग्रस्तांसाठी 14 टास्क फोर्स रत्नागिरी येथे पाठवल्या आहेत. (photo tweeted by @NDRFHQ)
आवश्यक त्या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून एअरलिफ्टींग सुरू करण्यात आली आहे. (photo tweeted by @NDRFHQ)
महाडमधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झालेली आहे. (photo tweeted by @NDRFHQ)
अडकलेल्या लोकांनी घराच्या छतावर किंवा उंचावर जावे, म्हणजे हेलिकॉप्टर मधील बचाव पथकाला ते दिसतील असे आवाहन प्रशासनाने केले. (photo tweeted by @DefPROMumbai)