PHOTO : भीषण! तळीयेतील आकांत... डोंगरानं गिळलं गाव! शब्दांपलीकडची दुर्घटना, दुर्देवी घटनेची छायाचित्रं

Raigad Mahad rain flood update

1/9
Raigad mahad talai landslide news Update : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामधील तळीये गावात दरड कोसळून जवळपास 36 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
2/9
हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
3/9
सततच्या पावसामुळं सातारा आणि रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत.
4/9
यात सर्वात मोठी दुर्घटना ही तळई गावात घडली असून या घटनेने हाहाकार माजला आहे. 
5/9
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला असून कोकणातील काही शहरं आणि गावं पाण्याखाली गेल्यानं नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे.
6/9
काल रात्रीच्या सुमारास ही दरड कोसळल्याची माहिती आहे.  मात्र हा दुर्गम डोंगराळ भाग असल्याने मदत कार्यात अडथळे येत होते.
7/9
मात्र काही वेळापूर्वी एनडीआरएफची टीम ज्यावेळी इथं पोहोचली त्यावेळी ही भयंकर घटना समोर आली. सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे.
8/9
मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. गेल्या काही तासांपासून इथं रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. 
9/9
एनडीआरएफसह स्थानिक प्रशासनची टीम देखील या ठिकाणी काम करत आहे. घटनेनंतर या गावालगतच्या सर्व वाड्यांमधील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. 
Sponsored Links by Taboola