Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PHOTO | साताऱ्यातील मिरगाव, पाटणमध्ये NDRF कडून 221 जणांना वाचवण्यात यश; बचावाचा थरार पहा
गेल्या 24 तासांत झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या असून आतापर्यंत 89 लोकांनी आपला जीव गमावला आहे.
अजूनही अनेक ठिकाणी लोक अडकले असून एनडीआरएफ आणि तिन्ही सैन्यदलाला मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे.
लष्कराने पूरग्रस्तांसाठी 14 टास्क फोर्स रत्नागिरी येथे पाठवल्या आहेत. तर हवाईदलाने 17 हेलिकॉप्टर्स मदतीसाठी पाठवले असून नौदलाची चिपळूणमध्ये पाच, महाडमध्ये दोन पथकं दाखल झाली आहेत.
सातारा जिल्ह्यातील मिरगाव, पाटण यासाठी एनडीआरएफच्या पथकाने 221 जणांची सुटका केली आहे. यात 72 पुरुष, 121 महिला आणि 28 मुलांचा समावेश आहे.
मुसळधार पावसामुळे कोकणासह सांगली, सातारा आणि कोल्हापुरातील परिस्थिती गंभीर होऊ लागली आहे.
अनेक घटनांमधून मृतांचे आकडे वाढताना पाहायला मिळत आहेत.
अंधार पडायच्या आतमध्ये आणखी लोकांना रेस्क्यू करण्याठी प्रयत्न केले जात आहेत.