Amravati News : कौंडिण्यपूरच्या रुक्मिणी मातेच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; वारीचं यंदाचे 430वं वर्ष
विदर्भाची पंढरी आणि आई रुक्मिणी मातेचे (Rukmini Mata) माहेर अशा श्रीक्षेत्र कौंडिण्यपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थानतर्फे पंढरपूर वारीचे आज 11 जूनला प्रस्थान झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरुक्मिणी मातेचा पायदळ पालखी दिंडी सोहळा हा गेल्या 430 वर्षांपासून अविरतपणे सुरु आहे.
संत सदाराम महाराजांनी 1594 साली या वारीला प्रारंभ केला होता.
वारीचे हे 430 वे वर्ष असून आई रुक्मिणी मातेची ही पालखी अतिशय जुनी असल्याने जागोजागी या पालखीचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत केलं जाते.
मजल दरमजल करत रुक्मिणी मातेची ही पालखी पंढरपूरसाठी प्रस्थान करत असते. या पालखी सोहळ्यात विदर्भासह राज्यातील वारकरी मोठ्या संख्येने सहभागी होत असतात.
वाशिष्ठा (वर्धा) नदीच्या काठावर असलेल्या या तीर्थक्षेत्राहून संत सदाराम महाराजांनी 1594 साली वारीला प्रारंभ केला.
आई रुक्मिणी मातेच्या माहेराहून निघालेली ही महाराष्ट्रातील पहिली पालखी आहे.
आज या पालखी प्रस्थान सोहळ्या प्रसंगी मोठ्या संख्येने अमरावतीकर सहभागी झाल्याचे बघायला मिळाले.
या पालखी सोहळ्याप्रसंगी वारकऱ्यांनी नाचत गाजत माऊलीचा गजर केला.
या पालखी सोहळ्यामुळे अमरावतीमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.