कोरडा पडलेला 'रामलिंगचा धबधबा' वाहिला, पहिल्याच पावसानं खुललं निसर्ग सौंदर्य
धाराशिव जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला असून आता पेरणीच्या तयारीला लागला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधाराशिव जिल्ह्यातील निसर्गरम्य ठिकाण असलेलं येडशी येथील रामलिंग मंदिर पुरातन आणि ऐतिहासिक आहे. या मंदिर परिसरात श्रावण महिन्यात दरवर्षी निसर्ग सौंदर्याचा देखावा डोळे दिपवणारा असतो
रामिलंगचा धबधबा म्हणून हे थंड हवेचं ठिकाण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून लाखो भाविक व पर्यटक येथील धबधबा पाहायला गर्दी करत असतात.
रामलिंगचा हा धबधबा यंदा पहिल्याच पावसानंतर पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे, बालाघाटाच्या पर्वतरांगेत वसलेल्या मराठवाड्यात मलिंगला मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते.
याठिकाणी पावसाळ्यात पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात. या काळात येथील हा धबधबा पर्यटकांचं विशेष आकर्षण ठरतो. गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे हा धबधबा आता मोठ्या जोमानं सुरू झाला.
दरवर्षी महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून पर्यटक येथील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी, पर्यटनासाठी येथे येत आहेत. या ठिकाणी महादेवाचे पुरातन मंदीर असून हे प्रसिद्ध निसर्ग पर्यटनस्थळ आहे.
विशेष म्हणजे उन्हाळ्यात कोरडा पडलेला हा धबधबा आता वाहू लागल्याने पर्यटक आणि धाराशिवकरांनी आनंद व्यक्त केला आहे