PHOTO : अरेच्चा! विहिरीत घर, तुम्ही कधी पाहिलंय?
आपण अनेक सुंदर अशा पुरातन विहिरी बघितल्या असतील. काही भागात या विहिरीला बावडी असं देखील म्हणतात. पण अमरावती जिल्ह्यात चक्क विहिरीत एक पुरातन काळातील घर असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे या विहिरीत एक मंदिर देखील आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमरावतीच्या पवनी गावातील श्याम घारड आणि मोहन घराड यांच्या शेतात दीडशे वर्षांपूर्वी पुरातन विहिर आहे. त्यात विहिरीमध्ये पुरातन काळातील एक घर आणि मंदिर असल्याचं समोर आलं आहे.
पवनी गावाच्या या विहिरीच्या आजूबाजूला दगडांमध्ये पुरातन मूर्तिकला पाहायला मिळतात.
या विहिरीच्या आत बारा दरवाजे आहेत. म्हणून या विहिरीला बारा द्वारी विहिर असं म्हटलं जातं. बारा द्वारी ही विहिर अष्टकोनी असून याचं बांधकाम मोगल काळातील आहे. या विहिरीचं संपूर्ण बांधकाम हे विटांनी केलेलं आहे.
या विहिरीत साप असल्याचं गावकरी सांगतात त्यामुळे या विहिरीत आजपर्यंत कोणीही उतरलं नाही. या विहिरीत बारा दरवाज्याच्या व्यतिरिक्त अजून खाली बारा दरवाजे असू शकतात असा अंदाज आहे. त्यामुळे या बंद असलेल्या बारा दरवाजाच्या आत काय असू शकते याचा संशोधकांनी शोध घेण्याची गरज आहे.
इतिहासक आणि संशोधकांच्या मते ही विहिर मुगल काळातील असू शकते. 17च्या दशकात या विहिरचं आणि त्याचं बांधकाम झालं असावं असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. मंदिरात कदाचित मुर्त्या असाव्या पण आता त्या नामशेष झाल्या असाव्यात.
विहिरीच्या दगडावर दत्तात्रय आणि प्रभू राम-सीता, लक्ष्मण यांचे शिल्प कोरले आहे. त्यामुळे या शिल्पाच्या निदर्शनातुन असं लक्षात येते की या विहिरीचं काम 17 किंवा 18व्या शतकातील असावं.
या विहिर आणि विहिरीतील घराचं संशोधन करून अधिकची माहिती समोर यावी आणि इथं पर्यटक स्थळ बनावं अशी मागणी आता होत आहे.