PHOTO : महाराष्ट्राच्या चेरापुंजीत वाहतोय उलटा धबधबा, तुम्ही पाहिलाय का?
सिंधुदुर्गातील वर्षा पर्यटनाचा मानबिंदू असलेल्या आंबोलीचा मुख्य धबधबा प्रवाहित झाला असून आजूबाजूचे अनेक छोटे मोठे धबधबेसुद्धा प्रवाहित झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोलीत आल्हाददायक वातावरण झालं आहे.
सध्या आंबोलीतील कावळेसाद पॉईंट येथे उलटया दिशेने वाहणारा धबधबा पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण ठरतो आहे.
सध्या आंबोलीतील कावळेसाद पॉईंट येथे उलटया दिशेने वाहणारा धबधबा प्रवाहित झाला आहे. सह्याद्रीच्या खोऱ्यातून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे या धबधब्यातुन पडणार पाणी दरीत खाली न जात वाऱ्याच्या वेगाने उलट्या दिशेने जात.
मुळात कावळेसाद पॉईंटला एका बाजूला सपाट मैदान तर दुसऱ्या बाजूला दीड ते दोन हजार फूट खोल दरी असल्याने याठिकाणी धुक्याचा लपंडाव पहायला मिळतो.
आंबोलीतील धबधबे, हिरवीगार वनराई, कावळेसाद पॉईंट, हिरण्यकेशी, सनसेट पॉईंट, नांगरतास धबधबा आणि जवळच्या चौकुळ गावचे निसर्गसौंदर्य आदी पर्यटनस्थळे याठिकाणी पर्यटकांना भुरळ घालतात.
महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस आंबोली पडतो त्यामुळे सह्याद्रीच्या कुशीत अनेक छोटे मोठे अनेक धबधबे मनमुराद पणे मुक्त हस्ताने आंबोलीत कोसळत असतात.
दरवर्षी आंबोलीत याठिकाणी हजारोंच्या संख्येने पर्यटक भेटी देतात. यात गोवा व कर्नाटक राज्यातील पर्यटकांना आंबोली हे जवळचे पर्यटनस्थळ असल्याने या ठिकाणच्या पर्यटकाची गर्दी मोठी असते. यंदा मात्र कोरोनामुळे हे पर्यटन स्थळ बंद आहे. आंबोलीच्या वर्षा पर्यटनाला सलग तिसऱ्या वर्षी फटका बसणार आहे. 2019 मध्ये अतिवृष्टी, गेल्यावर्षी कोरोना आणि यंदाही कोरोनामुळे वर्षा पर्यटन ठप्प आहे.