PHOTO : वाजतगाजत निघाली ग्रंथदिडी, उदगीरमध्ये सारस्वतांचा मेळा
लातूरमधील उदगीर इथे आजपासून 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया निमित्ताने उदगीरमध्ये तीन दिवस साहित्यिकांचा मेळा भरणार आहे.
उदगीरवासियांसह राज्यभरातील वाचक आणि रसिक या मेळ्याचा रसास्वाद घेणार आहेत.
तीन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल आहे.
साहित्यिकांबरोबरच संगीत क्षेत्रातील दिग्गज, हास्य अभिनेते, कवी, गझलकार, कथाकथनकार यांचं सादरीकरणासह राजकीय नेत्यांच्या भाषणाकडेही लक्ष लागून आहे.
ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे हे यंदाच्या संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
उदगीर येथे 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 22, 23 आणि 24 एप्रिल रोजी पार पडणार आहे.
उदगीर येथील उदयगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात हे संमेलन होत आहे.
साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे आज 22 एप्रिल रोजी सकाळी साडे सात ते सहा यावेळेत ग्रंथदिंडी काढण्यात आली.
यावेळी ग्रंथपूजन संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते पार पडलं. शहरातील प्रमुख मार्गावरुन ही ग्रंथदिंडी संमेलनस्थळी दाखल झाली.
उदगीर हे कर्नाटक आणि तेलंगणाच्या सीमेवर असल्यामुळे या भागातील निमंत्रीत कवींचे काव्यवाचन होणार आहे.