पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंदिरात ' मोगरा महोत्सव', तब्बल 50 लाख मोगरा आणि विविधरंगी फुलांची आरास
मोग-यासह गुलाब, चाफा, झेंडू, लिलीसारख्या फुलांनी सजलेला सभामंडप आणि गाभारा तसेच मुकुट, शुंडाभूषण, कान व पुष्पपोशाखाने सजलेले गणरायाचे मनोहारी रुप पुणेकरांना पहायला मिळाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात वासंतिक उटी मोगरा महोत्सवानिमित्त 50 लाख सुवासिक फुलांचा पुष्पनैवेद्य गणरायाला दाखविण्यात आला होता.
पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंदिरात ' मोगरा महोत्सव', तब्बल 50 लाख मोगरा आणि विविधरंगी फुलांची आरास करण्यात आली
कळसापासून पायथ्यापर्यंत केलेली पुष्पआरास आणि मोगरा महोत्सवानिमित्त विविधरंगी फुलांनी सजवण्यात आले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला.
पुष्पसजावटीची तयारी तब्बल 100 महिला व 125 पुरुष कारागिरांनी केली.
यंदाच्या पुष्पसजावटीमध्ये 700 किलो मोगरा वापरण्यात आला. 25 हजार चाफा, 50 हजार गुलाब, 50 किलो कन्हेर, जाई, जुई, केवळा, कमळ, 500 किलो गुलछडी, पासली, लिली यांसह अनेक प्रकारची फुले वापरण्यात आली होती.