Ajit Pawar meets Sharad Pawar : दिवाळी-भाऊबीजेला भेट नाही, आता बर्थडेला गाठीभेटी, पवारांच्या सरप्राईजमागे नेमकं काय?
आज (दि. 12 डिसेंबर) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा 84 वा वाढदिवस (Sharad Pawar Birthday) आहे, यानिमित्त अजित पवार यांनीही शरद पवारांची भेट घेतली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या शरद पवार आणि अजित पवार हा काका-पुतण्यातील वाद अखेर संपण्याची चिन्हं दिसत आहेत.
शरद पवार यांच्या 84व्या वाढदिवसानिमित्त अजित पवार हे गुरुवारी सकाळी सहकुटुंब नेते मंडळींसह पवारांच्या दिल्लीतील 6 जनपथ या निवासस्थानी पोहोचले.
एकीकडे या भेटीमुळे पवार वाद संपल्याची चर्चा सुरु झाली असताना या भेटीचा आणखी एक अर्थ काढला जात आहे.
अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेऊन भाजप नेतृत्त्वाला एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे का, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
अजित पवार म्हणाले की, आज साहेबांचा वाढदिवस आहे. उद्या काकींचा वाढदिवस आहे. त्यामुळे त्या दोघांचे दर्शन घेण्याकरता आम्ही त्या ठिकाणी आलेलो होतो.
पुढे अजित पवार म्हणाले, आम्ही काकांचं दर्शन घेतलं, चहा-पाणी झालं. सर्वसाधारण गोष्टींवर आमच्या चर्चा झाल्या.
परभणीला काल असे का घडले? राज्यात इतर ठिकाणी काय सुरू आहे? अशा पद्धतीच्या आमच्या चर्चा झाल्या.
आमच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? आमचं अधिवेशन कधी आहे? अशी चर्चा झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं.
दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी अजित पवार आणि पक्षाचे काही नेते शरद पवारांना (Sharad Pawar) भेटण्यासाठी दाखल झाले. यानंतर आता वाढदिवस हेच खरं कारण होतं का? की यामागे आणखी काही वेगळं कारण होतं? अशा चर्चांना उधाण आलं आहे.