अजितदादांनी गड पाहिला, बुरुजाचे चिरे तपासले; राजकोटवर शिवरायांचा नवा भक्कम पुतळा उभारण्याचा शब्द दिला!
तसेच, याच ठिकाणी शिवरायांच्या नावाला साजेसं स्मारक उभारण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाही दिवसांपूर्वी राजकोट किल्ल्यावर झालेल्या राड्यावरही अजित पवारांनी भाष्य केलं आहे. प्रत्येक नेत्यानं, कार्यकर्त्यानं तारतम्य ठेवावं, असं म्हणत अजित पवारांनी किल्ल्यातल्या राड्यावरून सुनावलं आहे.
त्यासोबतच नवा पुतळा कोण उभारणार, याबाबतही अजित पवारांनी बोलताना सांगितलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, दोन दिवसांपुर्वी जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे या सगळ्यांवर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटतायत, मी आत्ता अधिकाऱ्यांशी बोललो, तेव्हा त्यांनी यासंदर्भात मला माहिती दिली.
अनावरणाच्या वेळी सगळं चांगलं आणि व्यवस्थित होतं. लवकरात लवकर चांगल्यात चांगला पुतळा कसा उभारता येईल? यासाठी आम्ही चर्चा केली. काही लोक असं म्हणतात की, गेल्या वेळस घाई झाली होती, त्यासंदर्भात लोकांनी भाष्यही केलं, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
राजकोट किल्ल्याची पाहाणी केल्यानंतर अजित पवारांनी अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्वीट केलं आहे. त्यामध्ये अजित पवार म्हणाले की, मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना काही दिवसांपूर्वी घडली. आज घटनास्थळी भेट दिली, आढावा घेतला. किल्ल्याची देखील पाहणी केली.
अजित पवारांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, शिवराय आपला स्वाभिमान आहेत, आपली अस्मिता आहेत. याठिकाणी लवकरच महाराजांचा मजबूत आणि भक्कम असा पुतळा पुन्हा एकदा मानानं उभा राहील, असा शब्द देतो.
त्यासोबतच अजित पवारांनी सांगितलं की, संपूर्ण प्रकरणाची बारकाईनं चौकशी आणि तपास सुरू आहे जो कुणी गुन्हेगार आहेत ते पळून-पळून कुठे जातील, देशाच्या बाहेर तर जाणार नाही.
अजित पवार म्हणाले की, त्यासोबतच राम सुतारांसोबत झालेल्या बैठकीमध्ये पुतळ्याच्या पुढील घडणीसंदर्भात चर्चा झाली प्रत्येकानं आपापलं तारतम्य बाळगलं पाहिजे.
महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे (ठाकरे-राणे राडा) पुतळा पुन्हा उभारण्याचं काम ज्याला दिलं जाईल, त्याचा सगळा इतिहास-अनुभव लक्षात घेऊनच केला केला जाईल, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे, असं अजित पवार म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा पुतळा उभारण्याचं काम ज्यांना दिलं जाईल, त्यांचा पूर्वानुभव लक्षात घेऊन सगळ्या गोष्टी केल्या जातील, त्या करत असताना, वेळेचा अपव्यय टाळून गरजेपुरता जेवढा वेळ आहे, तो वेळ देऊन काम पूर्ण केलं जाईल, असंही अजित पवार म्हणाले आहेत.