काहीही करा, गोळ्या घाला, नारायण राणे बोलले; राजकोट किल्ल्यात ठाकरे-राणे समर्थक भिडले, Photo
नौदल दिनानिमित्त समुद्रकिनाऱ्यावरील सिंधुदुर्गमधील राजकोट परिसरात आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी दुपारी मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे कोसळला आणि अवघा महाराष्ट्र हळहळला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसदर घटनेवरुन राज्याचं राजकारण चांगलच तापलं आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे.
आज या घटनेवरुन महाविकास आघाडीकडून राजकोटमध्ये निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं.
यासाठी पहिले विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार राजकोट किल्ल्यावर दाखल झाले होते. यानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील देखील उपस्थित होते.
विजय वडेट्टीवार, जयंत पाटील यांच्यानंतर ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे, वैभव नाईक, अंबादास दानवे, विनायक राऊत देखील उपस्थित होते.
ठाकरे गटाचे नेते उपस्थित असताना याचवेळी खासदार नारायण राणे आणि त्यांचे पुत्र निलेश राणे देखील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी पोहचले असताना ठाकरे-राणे गट आमनेसामने आले.
राणे समर्थक आणि ठाकरे समर्थक आमने सामने आल्याने राजकोट किल्ल्यासमोर घोषणाबाजी देत एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रसंग सुद्धा घडला.
पोलिसांनी प्रसंगावधान राखत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
काही करायचे ते करा गोळ्या घाला हालणार नाही, असे आंडू पांडू आयुष्यभर पाहिले, आम्ही इथून जाणार नाही, असंही नारायण राणेंनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय डायवर्ट करायचा आहे. 15 मिनिटात राणे समर्थक खाली गेले नाहीत तर आम्ही शिवसैनिकांची ताकद दाखवणार, असा इशारा ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक म्हणाले.
शिवसैनिक म्हणून 15 मिनिटानंतर आदित्य ठाकरे यांचा आदेश देखील ऐकणार नाही, असं वैभव नाईकांनी सांगितले.
15 मिनिटात ते खाली गेले नाहीत तर शिवसेना देखील रस्त्यावरची संघटना आहे, असं वैभव नाईक म्हणाले.