Photo : आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा... पाहा फोटोंच्या स्वरुपात
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अयोध्येच्या दौऱ्यावर होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत शिवसैनिकामध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.
लखनौमध्ये देखील आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी शिवसेनेनं जय्यत तयारी केली. आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी लखनौमध्ये फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या.
आदित्य ठाकरे यांचं आज अयोध्येत जोरदार स्वागत करण्यात आलं. आदित्य ठाकरेंच्या स्वागताला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
इस्कॉन मंदिरातही आदित्य ठाकरेंचं जोरदार स्वागत करण्यात आलं. इस्कॉन मंदिरात आदित्य ठाकरेंचा सत्कार करण्यात आला.
आदित्य ठाकरे यांनी इस्कॉन मंदिरात आरतीही केली. त्यानंतर त्यांनी शिवसेना नेत्यांसह जेवण केलं.
अयोध्येत आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
संध्याकाळी पाचच्या सुमारास आदित्य ठाकरे यांनी हनुमानगढीवर हनुमानाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी हनुमानगढी येथील महंतांची भेटही घेतली.
सायंकाळी सव्वापाच वाजता आदित्य ठाकरे रामलल्लाच्या दर्शनासाठी दाखल झाले.
श्री रामांचं दर्शन घेतल्यानंतर सायंकाळी सव्वासहा वाजता आदित्य ठाकरे लक्ष्मण किल्ल्याच्या दिशेने निघाले.
लक्ष्मण किल्ल्याचं दर्शन घेतल्यानंतर आदित्य ठाकरे शरयू काठावर दाखल झाले. आदित्य ठाकरेंच्या हस्ते त्या ठिकाणी महाआरती करण्यात आली.