Photo Gallery : औरंगाबादमध्ये कुरियर कंपनीवर कारवाई, मोठ्या प्रमाणात सापडला शस्त्रसाठा,2 जण ताब्यात
औरंगाबादमध्ये कुरियर कंपनीकडून मागवण्यात आलेला शस्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. शहरात एका दिवशी डीटीडीसी नावाच्या कुरियर कंपनीकडून आलेल्या 37 तलवारी आणि एक कुकरी औरंगाबादच्या क्रांती चौक पोलिसांनी जप्त केल्या आहेत
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयापूर्वी देखील दोन वेळा मोठ्या प्रमाणावर कुरियर कंपनी कडून आलेला शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय
औरंगाबादेतच एवढ्या मोठ्या तलवारी का येतात हे तपासणे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे. दरम्यान क्राईमब्रँच कडून तलवार मागवणारे 2 जण ताब्यात घेण्यात आले आहेत,
ताब्यात असलेल्या दोघांकडून चौकशी करण्यात येत असून औरंगाबादेतील 5 आणि जालन्यातील 2 जणांनी 37 तलवारी 1 कुकरी मागवल्या असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
औरंगाबादेतच एवढ्या मोठ्या प्रमाणावर सातत्याने तलवारी का येतात. कुठून आणि कशी येतात याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, जालिंदर आणि अमृतसर येथून मागवण्यात आल्या आहेत. या 37 तलवारी सात जणांच्या नावावर मागवण्यात आल्या आहेत. यातील पाच जण औरंगाबाद येथील तर दोन जण जालन्यातील आहेत.