पाहा फोटो : राजापूरमधील प्रस्तावित रिफायनरी विरोधात स्थानिकांचा एल्गार
कोकणातील प्रस्तावित रिफायनरीच्या मुद्यावरून आता वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे. कोकणात रिफायनरी व्हावी याची मागणी होत असताना दुसरीकडे रिफायनरीला विरोध करणाऱ्या कोकणवासियांनी आज राजापूरमध्ये मोठा मोर्चा काढला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाणारऐवजी आता रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यात होणार असल्याची चर्चा आहे. राजापूर तालुक्यातील बारसूचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
रत्नागिरीतील नाणार येथील प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्प पर्यावरण, पुनर्वसन आणि स्थानिकांच्या मोठ्या विरोधामुळे बारगळला होता.
या प्रकल्पामुळे कोकणातील निसर्ग, समुद्र, फळबागांवर परिणाम होऊ शकतो अशी भीतीही स्थानिकांनी व्यक्त केली. कोकणातील जैवविविधताही या प्रकल्पामुळे धोक्यात येणार असल्याचे स्थानिकांनी म्हटले.
राजापूरमधील प्रकल्पाच्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं असल्याचे समोर आले आहे. हे पत्र 14 फेब्रुवारीलाच हे पत्र लिहिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रानुसार, रिफायनरीसाठी जवळपास तेरा हजार एकर जागा आणि बंदरासाठी जवळपास 2414 एकर जागा देण्यात येणार आहे.
स्थानिकांसोबत, भुमीपुत्रांसोबत चर्चा करुन त्यांचे हक्क कसे अबाधित राहतील, त्यांचे हक्क कसे मिळतील हे पाहणं सरकारची प्राथमिकता असल्याचे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
स्थानिकांचा, प्रकल्पबाधितांचा विश्वास संपादित करुन पुढं जायचं आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले.