कोकणसह, विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट
राज्यात कुठं पाऊस तर कुठं ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. काही भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआजही राज्यात मुसळधार पाऊस, पडण्याच अंदाज हवामान विभागानं (IMD) वर्तवला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज काही भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी केला आहे.
काही भागात पावसाचा यलो अलर्ट (Yellow alert) जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा या तीन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे
मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.
ज्या ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे, त्या ठिकाणी शेतीच्या कामांना वेग आला आहे. शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त असल्याचं पाहायला मिळत आहे.
जेष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 जुलै (उद्यापासून) ते 10 जुलैपर्यंत राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळणार आहे.