PHOTO : कोकण रेल्वे मार्गावर विजेचं काम करणाऱ्या विशेष गाडीला आग, वाहतूक विस्कळीत
सदाशिव लाड, एबीपी माझा
Updated at:
09 Jun 2021 12:47 PM (IST)
1
कोकण रेल्वे मार्गावर कुडाळ-झाराप रेल्वे स्टेशनच्यामध्ये असलेल्या तेर्सेबांबर्डे गेटजवळ विजेचं काम करणाऱ्या स्पेशल गाडीला आग लागली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
तेर्सेबांबर्डे गेटजवळ कोकण रेल्वे मार्गावर हे काम सुरु असताना कोकण रेल्वेच्या काम करणाऱ्या बोगीला अचानक आग लागली.
3
ही आग आटोक्यात आणण्यासाठी कुडाळ एमआयडीसी, सावंतवाडी आणि वेंगुर्ले इथून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
4
या लागलेल्या आगीत बोगीचे आणि दुरुस्ती साहित्याचे नुकसान झाले आहे.
5
कोकण रेल्वेच्या मुख्य मार्गावर सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.
6
दरम्यान यामुळे राजधानीसह, जनशताब्दी, मांडवी या रेल्वे खोळंबल्या असून कोकण रेल्वेची वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली आहे.