Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
White Snake: सोलापूरमध्ये आढळला रंगहीन गवत्या साप; सोलापुरात पहिल्यांदाच आढळली सापाची दुर्मिळ प्रजाती
सोलापूरच्या विडी घरकुल येथील अश्विनी दत्तात्रय गट्टी यांच्या घरी एक छोटसं सापाचं पिल्लू आढळून आलं. तसं साप म्हंटलं की घाबरगुंडी उडतेच,पण हा साप खूप छोटा असल्याने त्यांनी स्वतःला सावरलं आणि लगेच सर्पमित्राला बोलावलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसर्पमित्र इम्रान पटेल इस्माईल रंगरेज यांना फोन वरून माहिती दिली असता ते घटनास्थळी पोहोचले. इम्रान पटेल यांना वाटलं की छोटा साप म्हणजे कवड्या किंवा तस्कर असं काहीतरी असेल.
पण सर्पमित्राने शोध घेतल्यानंतर त्याला एक छोटासाच साप दिसला खरा, पण त्याला पाहून ते क्षणभर चक्रावून गेले.
हा साप तर आहेच, पण आपल्या सोलापूर शहरातील नाही, कारण जिल्ह्यात त्यांना असा साप याआधी कधी सापडला नव्हता.
सर्पमित्राने तो साप विषारी समजून त्याला अलगद उचलून बरणीमध्ये बंद केलं आणि सर्पमित्र औदुंबर गेजगे यांच्याकडे घेऊन जाऊन त्या सापाची पाहणी केली.
पाहणीत असं समोर आलं की सोलापुरात पहिल्यांदा असा साप आढळला आहे आणि हे रंगहीन गवत्या सापाचं (Albino Grass Snake) पिल्लू आहे आणि तो बिनविषारी असल्याचीही माहिती सर्पमित्राने दिली.