PHOTO : मेकॅनिकल इंजिनिअर युवकाची सुरगण्यातील 'रानझोपडी' कशी आहे?
आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकजण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी उच्चशिक्षण घेऊन नोकरी करतात. अशातच ग्रामीण भागातील एखादा तरुण शिक्षण घेऊन चांगल्या नोकरीला लागला तर गावात वाहवा होते. पण आता काळ बदलला आहे, तरुण वर्ग शिक्षण घेऊन व्यवसाय, विशेष म्हणजे शेतीकडे वळू लागला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतरीही ग्रामीण भागातील काही ठराविक युवक सोडले तर शेतीकडे वळणारा वर्ग खूप कमीच आहे. परंतु, सुरगाणा तालुक्यातील युवा इंजिनिअरने नोकरी न करता आपल्या माळरानात कृषी पर्यटन उभारून नंदनवन फुलविले आहे.
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील गारमाळ येथील हर्षद थविल या शिक्षित तरुणाने सुरगाणासारख्या आदिवासी भागातून येऊन बीई मेकनिकल केले, परंतु पहिल्यापासूनच गावातच काहीतरी करण्याचा निश्चय केलेल्या हर्षल मॅकेनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले. मात्र गावाकडच्या मातीची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. अखेर इंजिनिअरिंग झाल्यानं हर्षद पुन्हा गावी परतला.
गावाकडच्या दुष्काळी शेतीकडे दुर्लक्ष न करता उलट आपली इंजिनिअरिंगची पदवी व त्यापोटी मिळणारी नोकरी व आर्थिक लाभ सोडून गावाकडे येऊन शेतीला नवसंजीवन देण्याचे त्याने ठरविले.
हर्षदला झाडांची आवड असल्याने त्याने सुरवातीला कॉफ़ी, कोको, अमेरिकन सुपरफूड अवाकाडो, लिची, ड्रॅगन फ्रूट, चिकू, पपई, फणस, सीडलेस लिंबू, थायलंड चेरी, गुलाबी फणस, सफेद जांभूळ, स्टार फ्रुट, इलिफंट अॅपल, पेरु, हापूस आंबे, मँगो स्टीन, सीताफळ, केळी आदी झाडांसह कमळाचे व कुमुदिनीचे वेगवेगळे 13 प्रकारांची लागवड केली.
ग्रामीण भागातला हा परिसर नेहमीच पर्यटकांचा आकर्षण ठरलेला असतो. ही बाब हेरुन हर्षदने कृषी पर्यटन सुरु करण्याचे ठरवले. या माळरानावर नामशेष होणाऱ्या रानभाज्याची लागवड केली. हळूहळू पाण्याचे छोटे छोटे तलाव, विविध प्रकारची झाडे, गवतफुले, छोटीशी झोपडी आदी उभारुन कृषी पर्यटन केंद्र उभे केले.
या दरम्यान त्याला आवड असलेल्या वारली चित्रकलेचा चांगला उपयोग झाला. येथील झाडांवर, भिंतींवर, विविध ठिकाणी वारली चित्रे काढण्यास सुरवात केली. या कामी त्याने सोशल मिडीयाचा वापर करीत हे पर्यटन केंद्र लोकांसमोर आणले.
लागलीच काही मित्रांनी या ठिकाणी भेट देत स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगितले. अनेक दिवसांपासून सुरु केलेल्या कृषी पर्यटन केंद्राला चांगलाच प्रतिसाद लाभत आहे. अनेक कुटुंब या ठिकाणी भेट देऊन नैसर्गिक भोजनाचा आस्वाद घेत आहेत.
सध्या प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 'फॅमिली कॅम्पिंग' ची संकल्पना राबवण्यात येत आहे. यामध्ये आपल्याला या ठिकाणी भेट द्यावयाची असल्यास संपर्क करून पूर्वकल्पना देण आवश्यक असते.
त्यानंतर तेथे कृषी पर्यटनाबरोबर पारंपरिक जेवण दिले जाते. यामध्ये नागलीची भाकर, रानभाज्या यासह आदिवासी गावाकडील जेवणाची चव याठिकाणी चाखायला मिळते.