Beed News: निवेदनाची गाठोडे डोक्यावर घेऊन शेतकऱ्यांनी काढली दिंडी
गोविंद शेळके, एबीपी माझा
Updated at:
12 Jan 2023 11:07 AM (IST)
1
पीकविमा आणि अतिवृष्टी अनुदानाची रक्कम तत्काळ मिळावी यासाठी आडस परिसरातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
शेतकऱ्यांनी मागणीसाठी निवेदनाची गाठोडे डोक्यावर घेऊन चक्क 25 किलोमीटरची दिंडी काढली.
3
सामाजिक कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आडस ते केज अशी पायी दिंडी काढली होती.
4
तक्रार अर्जाचे गाठोडे डोक्यावर घेऊन, बंडी आणि अर्धी चड्डी अशा पेहरावात दिंडी काढली.
5
छत्रपती शिवाजी महाराज चौकातून कळमआंबा, चंदनसावरगाव, कुंबेफळ, ढाकेफळ मार्गे तहसील कार्यालय, केज असे 25 किलोमीटर पायी मोर्चा काढून तहसील प्रशासनाला तक्रारी अर्जाचे गाठोडे सादर करण्यात आले.
6
दुपारी 12 वाजता तहसीलदार दुलाजी मेंडके यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले.
7
या हटके आंदोलनाची सर्वत्र जोरदार चर्चा पाहायला मिळाली.