आज राजमाता जिजाऊंचा 425 वा जन्मोत्सव सोहळा; शासकीय पूजेनंतर सोहळ्याचा प्रारंभ
राजमाता जिजाऊ यांचा आज 425 वा जन्मोत्सव सोहळा.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव सोहळा मातृ तीर्थ सिंदखेडराजा येथे साजरा केला जाणार आहे.
लखोजी जाधव यांच्या वंशजांनी आज सकाळी सहा वाजता पूजा करून या जन्मोत्सव सोहळ्याची सुरुवात केली.
त्यानंतर शासकीय महापूजा होऊन सर्वसामान्य जिजाऊ भक्तांना राजवाडा दर्शनासाठी खुला करण्यात आला.
आज जन्मोत्सवानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे.
जिजाऊंच्या वंशजांनी राज्यातील जनतेला जिजाऊ जन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्यात.
लखोजी जाधव यांचे वंशज विजय राजे जाधव म्हणाले की, शासनाने समृद्धी महामार्ग तयार करून सिंदखेड राजा येथे जिजाऊ भक्तांना येण्यासाठी फार मोठी सोय करून दिली आहे.
तसेच, विजय राजे जाधव यांनी सिंदखेड राजा महामार्गावर आणलंय, त्यामुळे शासनाचे धन्यवाद मानलेत.
आज दिवसभर सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मोत्सवाचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.