PHOTO : राज्यातील 7000 निवासी डॉक्टर संपावर, काय आहेत मागण्या?
विविध मागण्यांसाठी मागील एका वर्षापासून मंत्र्यांसोबतच इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठका होऊनही प्रतिसाद न दिल्याने निवासी डॉक्टरांनी आजपासून संपाचा हत्यार उगारलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरुग्णालयातील इमर्जन्सी सेवा वगळता इतर सेवा देताना काम बंद आंदोलन करत निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे
राज्यभरातील 7000 निवासी डॉक्टर संपावर गेल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडणार आहे.
मुंबईतील केईएम ,नायर ,सायन, कूपरर रुग्णालयात काम करणारे निवासी डॉक्टर्स नायर रुग्णालय बाहेर जमलेले पाहायला मिळत आहेत.
काय आहेत निवासी डॉक्टरांच्या मागण्या? 1. वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या 1 हजार 432 जागांची पदनिर्मिती. शासनाकडे हा प्रस्ताव रखडला आहे.
2. शासकीय आणि महाविद्यालयात अपुऱ्या आणि मोडकळीस आलेल्या वसतिगृहामुळे होणारी विद्यार्थ्यांची हेळसांड
3. सहयोगी आणि सहाय्यक प्राध्यपकांची अपुरे पदे तातडीने भरणे
महागाई भत्ता तात्काळ देण्यात यावा
5. वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनातील तफावत दूर करत सर्व निवासी डॉक्टरांना समान वेतन लागू करणे