PHOTO: शेकडो फुट उंच आगीच्या ज्वाळा, आकाशात धूरच धूर अन् जमिनीवर कामगारांचा आक्रोश
इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलीफील्म कंपनीतील एका प्लँटमधे बॉयलरच्या स्फोटाने भयंकर आग लागली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया आगीत आतापर्यंत 19 कामगारांना रेस्क्यू करण्यात आले होते.
यातील 4 कामगार गंभीर असताना यातील दोन महिला कामगारांचा मृत्यू झाला आहे.
या मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत व जखमींवर सर्व उपचार करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितले.
इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव औद्योगिक वसाहतीतील सर्वांत मोठा असणाऱ्या जिंदाल पॉलिफिल्म कारखान्यातील एस एस पी 2 या प्लँटमधे सकाळी आठ ते अडीच वाजेच्या शिफ्टला जवळपास 100 कामगार उपस्थित होते.
सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास बॉयलर हीट झाल्याने मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली.
या प्लँटमधील 19 कामगारांना नाशिक येथील सुयश हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले होते पैकी दोन महिला कामगारांचा मृत्यू झाला आहे. या आगीचे रौद्ररूप इतके भयंकर होते की इगतपुरी तालुक्याच्या विविध भागात आकाशात आगीचे लोळ दिसत होते,
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या घटनेमुळे जिल्हाभर हळहळ व्यक्त होत आहेत.
आगीमुळे मोठी जीवित अथवा वित्तहानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या ठिकाणी जवळपास शंभर फूट उंच आगीच्या ज्वाला, शेकडो फूट उंच हवेत काळा धुरच धूर दिसत आहे.