Latur: लातूरच्या ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेची सांगता, आकर्षक रोषणाईने परिसर उजाळून निघाला
लातूरनगरीचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थान यात्रेची सोमवारी सांगता झाली. (सर्व फोटो सौजन्य - लकी गहेरवार)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया यात्रेची सांगता होताना मंदिराच्या आवारात आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.
वेगवेगळ्या आणि मनमोहक रोषणाईमुळे हा परिसर झळाळून निघाला. त्यामुळे अनेकांच्या डोळ्याचे पारणे फिटले.
लातूरनगरीच्या ग्रामदेवतेच्या यात्रेत जिल्हाभरातूनच नव्हे तर कर्नाटक, तेलंगणा आणि मराठवाड्यातून लोक दर्शनासाठी येत असतात.
लातूरनगरीचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थान यात्रेची सुरुवात महाशिवरात्रीपासून होते.
मंदिर परिसरात असलेल्या भव्य मैदानात विविध वस्तू विक्रीचे दुकाने थाटली जातात.
त्याचबरोबर आकाश पाळणे, मौत का कुवा यासारखी विविध प्रकारच्या गोष्टींचा आनंद या यात्रेत घेता येतो.
कृषी प्रदर्शन, हस्तकला प्रदर्शन, पशू प्रदर्शन, आरोग्य शिबीर आणि कुस्त्याचा फड यात्रेत आयोजित केला जातो.
या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात आकाशात रोषणाई करत सांगता समारोह साजरा केला जातो.